प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्टेशनदरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यास मुंबई हायकोर्टाने हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक परवानगी मिळाल्यानंतरच रेल्वेला नव्या प्रकल्पाचे काम सुरू करता येईल.
↧