मुंब्रा आणि कल्याण खाडीत बेकायदेशीरपणे रेती उपसा करणाऱ्या माफियांचे कंबरडे महसूल यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने गेल्या दोन दिवसांत मोडून काढले. मुंब्रा येथील कारवाईत १० सक्शन पंप आणि ३ बोटी असा १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर कल्याणात ७ लाखांचे २ सक्शन पंप ताब्यात घेण्यात आले.
↧