फार्मसिस्ट नसलेल्या मेडिकल दुकानांवरील फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए)ची कारवाई सुरूच असून, गेल्या महिनाभरात ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील २६ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याने त्यांना टाळे लागले आहे. या कारवाईचा धसका घेऊन महिनाभरात जवळपास ४० मेडिकल दुकानदारांनी दुकान बंद करत असल्याचे एफडीएला कळवले आहे.
↧