कल्याण-डोंबिवलीतील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने डिझेलचे बिल थकवल्याने शहराच्या काही भागांमध्ये घंटागाडी फिरकलेल्या नाहीत. यामुळे डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेत कचऱ्याचे ढीग साठल्याचे चित्र आहे. या समस्येवर दोन दिवसांत तोडगा काढण्याचे फर्मान स्थायी समितीच्या सदस्यांनी काढले आहे.
↧