शिळफाट्याच्या दुर्घटनेनंतर ठाणे शहरातील ३० वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सक्ती पालिकेने केली आहे. पालिकेने नेमलेल्या स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून हे ऑडिट करून, त्याचा अहवाल पालिकेला सादर करावा अशा सूचना पालिकेने जारी केल्या आहेत. हा रिपोर्ट सादर न केल्यास, इमारतींवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.
↧