एकीकडे विजेच्या भरमसाठ बिलामुळे नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे वीज चोरांनी धुमाकूळ घातला आहे. कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळा परिसरात महावितरणने वीजचोरांवर कारवाई करत ७ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ९५ हजार ६२० रुपयांची वसुली करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
↧