मराठमोळी लंगडी जगभर पोहोचली असून, लंगडीची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच नेपाळ येथे झाली. या दौऱ्यात भारतीय पुरुष व महिला संघांनी नेपाळवर विजय मिळवत या आंतरराष्ट्रीय दौऱ्याचा शुभारंभ केला. नेपाळपर्यंत न थांबता भूतान, बांगलादेश, श्रीलंका या देशांमध्येही आशियाई लंगडी फेडरेशनतर्फे लंगडीचा प्रसार केला जाणार आहे.
↧