रिक्षाचालकांच्या मुजोरपणामुळे त्रस्त झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेले काही दिवस प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्या आणि प्रवासी संघटनांनी निर्माण केलेला दबाव यांमुळे रिक्षाचालक मालक संघटनेने मीटर पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी शनिवारी सकाळी तातडीची बैठक बोलावली आहे.
↧