महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या घटना कमालीच्या वाढल्या असून राज्यात दररोज सरासरी १५ महिलांचे सौभाग्यलेणे हिसकावून चोर पोबारा करीत आहेत. यात सर्वाधिक साखळीचोरीच्या घटना मुंबई-ठाण्यात होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभरात राज्यात ५ हजार ४७१ महिलांचे ३१ कोटींचे दागिने चोरीला गेले.
↧