महापालिकेने ऐरोली सेक्टर-५ येथे ९०० आसनक्षमतेचे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ६० कोटी रुपयांच्या खर्चाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. दोन वर्षांत या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण करणाची योजना आहे. वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहानंतर महापालिकेच्या मालकीचे हे नवी मुंबईतील दुसरे नाट्यगृह ठरणार आहे.
↧