बारा दिवसांच्या मुलीला विषारी साप चावल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीजवळील आहिरे गावात रविवारी घडली. सर्पदंशानंतर तिला तात्काळ डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
↧