महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने (एमआयडीसी) घेतलेल्या पाणी दरवाढीच्या निर्णयाला भाजपने विरोध दर्शवला आहे. या दरवाढीला विरोध करण्यासाठी सोमवारी आ. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ही दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
↧