दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या ऑनलाइन अडमिशन प्रक्रियेला सुरुवात झाली. यंदा गुणपत्रिका मिळण्याआधीच केवळ प्रिंटआऊटच्या मदतीने अडमिशन सुरू केल्याने शाळांमध्ये विद्यार्थांच्या प्रवेशासाठी रांगा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याचवेळी शाळांमध्ये वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थांच्या ऑनलाइन प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
↧