१९९२-९३ साली टीएमटी बसेसची बॉडी बांधण्यासाठी कंत्राट निघाले आणि घोटाळ्याची पहिली पायरी ओलांडली गेली. या घोटाळ्याप्रकरणी तब्बल २० वर्षांनंतर शनिवारी ठाणे सेशन्स कोर्टाने शिक्षा ठोठावली. १५० तारखांना झालेल्या सुनावणी दरम्यान तीन आरोपींसह तीन वकीलांचा मृत्यू आणि १८ न्यायाधीश बदलल्यानंतर अखेर घोटाळेबहाद्दरांना शिक्षा झालीच.
↧