वसई गावातील सुरूच्या बागेतील झाडांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत असून त्यामुळे समाजकंटकांनी काही दिवसांपूर्वी येथील झाडे जाळून टाकली. आता पालिकेने या जागी दुप्पट झाडांची लागवड करून सुरूच्या बागेत वृक्ष, पर्यावरण संवर्धन तसेच सुरूची बाग विकास योजना राबवावी, असे साकडे पर्यावरणप्रेमींनी घातले आहे. पालिका पर्यावरणासाठी दरवर्षी करोडोंची तरतूद करत असली तरी सुरूची बाग का दुर्लक्ष राहते, असा सवाल करण्यात येत आहे.
↧