नवघर पोलिसांच्या हद्दीतील भाईंदर पूर्व प्रभाग ३१ मधील दीपक हॉस्पिटल गल्लीतील फेरीवाल्यांचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. येथील ‘ना फेरीवाला क्षेत्रात’ फेरीवाले बसत असल्याने त्यावरून वाद निर्माण झाला आहे. फेरीवाल्यांना बेदम मारहाण करणे, खंडणी मागणे व दंगल या कलमान्वये पालिकेच्या विरोधी पक्षनेत्यासह ७ जणांविरोधात नवघर पोलिसात फेरीवाल्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद झाला आहे.
↧