उन्हाळा आला की दरवर्षी वाट पाहिली जाते ती कोकणच्या आंब्याची... खवय्यांना भुरळ घालणारा आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेला हा मधुर आंबा बाजारभावापेक्षा कमी दरात ठाणेकरांना आता मिळणार आहे. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने येथील न्यू इंग्लिश शाळेच्या पटांगणात १ ते ९ मेदरम्यान आठवा आंबा महोत्सव भरवण्यात येत आहे.
↧