अपघातात अपंगत्व आलेल्या शाळा शिक्षकाला ठाणे मोटार अपघात दावा न्याय प्राधिकरणाने दाव्यापेक्षा दुप्पट भरपाई मंजूर करुन सुखद धक्का दिला आहे. अर्जदार प्रवास करत असलेल्या टेम्पोला धडक देणाऱ्या ट्रकचालकाने लायसन्सचे नूतनीकरण केले नसल्याने, भरपाई देण्यास आपण बांधील नसल्याचा दावा संबंधित विमा कंपनीने केला होता. पण प्राधिकरणाने हा दावा फेटाळत भरपाईचा अर्ज मंजूर केला.
↧