कल्याण- डोंबिवलीतील मीटरसक्तीची मोहीम थंडावल्याने रिक्षाचालक पुन्हा मीटरनुसार जाण्यास नकार देऊ लागले आहेत. त्यामुळे कल्याण आरटीओला मीटरसक्तीसाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. सोमवारी आरटीओने मीटरनुसार जाण्यास नकार देणाऱ्या चार रिक्षा जप्त केल्या.
↧